काही माणसे सुखाचे धागे ,
आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक माणसे भेटतात , काही माणसे आपल्याला सतत दुखी भासतात , काही लोकांसमोर गेलो तर एक वेगळेच दडपण येते पण काही अशी असतात कि नेहमी आपल्याला सुख देऊन जातात , आपल्या सुखाचे आनंदाचे ते स्रोत असतात . त्यांच्याशी आपण थोडे जरी बोलो तारो ते आपल्याला एक ताकत देऊन जातात जगण्याची. त्या दोघांना जोडणारा धागा म्हणजे त्यांचा जुळणारा स्वभाव , त्यातील आपलेपणा , त्यातील ओलावा जो त्या नात्याला ऊब देतो . मग बाहेर कितीही हि गारठा असला तरी ती ऊब काही कमी होत नाही.
त्या धाग्याला काही नाव असेलच असे नाही , ती व्यक्ती असेल असे नाही , तो कोणताही एक जीव असू शकतो जो तुम्हाला ती ऊब देत असतो तुम्हाला सुखाच्या धाग्यांनी बांधून ठेवत असतो.
असा मला भेटलेला धागा . तो कधी प्रत्यक्ष भेटला नाही पण तो सुखाची ऊब देतो मला कायम . मी कितीही दुखत असलो तरी ,
आजच्या जगात सोसिअल media मुले आपल्या अनेक लोके त्यांचा सुखाचा चेहरा दाखवतात. कारण ते फक्त त्यांच्या आनंदाचे जे क्षण असतात ते share करतात . पण त्यातल्या दुःखाचे जे क्षण असतात ते त्यांच्या कुटुंबातील लोकांबरोबर म्हणजेच त्यांचे सूख - दुःखाचे धागे जे सुखात आणि दुःखात प्र्यातेक्ष सहभागी असतात . म्हणजे परिस्तिथि प्रमाणे वागणारे धागे . पण मला एक असा धागा हवा आहे जो नेहमी मला सुखाची चाहूल देईल तो धागा मला सापडला , मी आजारी असेल , मी खूप व्यस्त असेल , मी रागात असेल , मी दुखी असेल , मी खूप टेन्शन मध्ये असेल किंवा अजून काही पण या परिस्तिथीही मी त्याधाग्याशी मी जोडला जाईल तेव्हा मला सुखाची , आनंदाची चाहूलच लागते . कारण मी त्याला माझ्या दुःखाची चाहूल देऊन जो माझा हा शुद्ध सुखाचा धागा आहे तो मला सुख दुःख असा एकत्र करायचा नाही आहे .
तुम्ही देखी असं असुखाचा धागा कोणाचा होऊ शकता जो समोरच्याला नेहमी आनंदाची चाहूल देईल तुमची उपस्तिती एक आनंदाचे वलय निर्माण करेल
असा हा सुखाचा धागा तुम्ही सापडावा किंवा तुम्ही कोणाचा तरी शोध पूर्ण करा . कारण आपण जे देतो तेच तर परत आपल्याला भेटते मग आपण जर सुख देत राहिलो तर आपल्याला सुख का नाही भेटणार. आणि एक धागा शोदाता शोदाता तुम्हाला अनेक धागे भेटतील. आणि या अनेक धाग्यामुळे तुमच्या जीवनाची एक उबदार चादर नक्कीच तयार होईल .
No comments:
Post a Comment